अनिल कांबळे
नागपूर,
nagpur water park tragedy काटोल तालुक्यातील कोंढाळीजवळ असलेल्या अब्रेशिया मेट्रोपार्क येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त कुटुंबीयांसोबत स्विमिंग पुलावर गेलेल्या एका सात वर्षीय मुलगा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अभिनंदन कमलेश नागरवाडे (संदेशसीटी, जामठा) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी वॉटरपार्कचे मालक आणि व्यवस्थापकावर कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश नागरवाडे हे १५ ऑगस्टला पत्नी व दोन मुलांसह कोंढाळीजवळील अब्रेशिया मेट्रोपार्क येथे गेले होते. ते कपडे बदलण्यासाठी आतमध्ये गेले असता मुलगा अभिनंदन हा स्विमींग टँकमध्ये गेला. त्याला पोहणे येत नसल्यामुळे तो बुडला. काही युवकांनी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत अभिनंदनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नरेश गणपतराव पवनीकर ( वय ४५, रा. गोधनी) आणि व्यवस्थापक सुनील वसंतराव भोयर (वय ३१, कोंडासावरी, ता. काटोल) अशी आरोपींची नावे आहेत.