दहशतीच्या सावटात तिरंगा फडकला

आम्ही तुमच्या सोबत आहोत!

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Naxal-affected areas नक्षलग्रस्त आणि संवेदनशील भागात जनसंघर्ष समिती, नागपूरच्या वतीने धाडसाने तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमातून दहशतीच्या सावटाखाली जगणाऱ्या नागरिकांना ‘तुम्ही एकटे नाही’ असा विश्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 

sanket  
 
 
यावेळी १५ ऑगस्ट २०२५ रोजी याच परिसरात विद्यार्थ्यांसह ग्रामीण आदिवासी नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करणारे शहीद मनीष नुरुटी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या बलिदानाला नमन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वाखाली अभिषेक सावरकर, विशाल निरगुळे, रोहित मौंडेकर यांच्यासह समितीचे कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते. नक्षलवादाची दहशत संपून प्रत्येक गावात तिरंगा अभिमानाने फडकावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.‘तिरंगा केवळ हातात नाही, तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे,’ या भावनेने उपक्रमाची सांगता करण्यात आली,
सौजन्य:संकेत बांगडकर,संपर्क मित्र