स्वातंत्र्यदिनी मोफत नेत्र तपासणी

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Rahul Buddha Vihar पवननगर येथील राहुल बुद्ध विहारात ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्ञानोदय बहुउद्देशीय जनकल्याण संस्था, सुगत नगरच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले. शिबिरात २०० हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

sunil  
 
संस्थेतर्फे वर्षभर नेत्र तपासणी व चष्मे वाटप, रक्तदान, वृक्षारोपण तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणक प्रशिक्षणासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. शिबिराला संस्थेचे अध्यक्ष राहुल वासनिक, सचिव सुनील वाघ, कोषाध्यक्ष मनोहर डोंगरे तसेच कमलेश कोटावार, मनोज साने आणि हेमंत बंग यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.
सौजन्य:सुनील वाघ ,संपर्क मित्र