नागपूर
Senior Citizens' Association वरिष्ठ नागरिक मंडळ, सोनेगावच्या वतीने सोनेगाव तलाव परिसरात ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश खापेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक ईश्वर ढेंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ९२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नानासाहेब बारहाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. श्रीधर मानकर, पारेखजी व नखातेजी यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. ईश्वर ढेंगळे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवातून तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन श्रीधर मानकर यांनी केले.
सौजन्य:लता खापेकर,संपर्क मित्र