नागपूर
Umiyashankar High School श्री उमियाशंकर नारायणजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे नरेंद्र झा, खेतालाल पटेल व विनोद पटेल यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना बॅच प्रदान करण्यात आले.
शाळा कॅप्टन आदर्श झा, हेड गर्ल खुशी बनपेला, हेड बॉय चैतन्य कुंजलकर, को-ऑर्डिनेटर काव्य बारापात्रे, डेप्युटी हेड बॉय सचिन सातपुते, स्पोर्ट्स हेड बॉय रुद्र कावरे व कल्चरल हेड विशेष कलसे यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच हाऊस कॅप्टन, उपकॅप्टन व विविध पदांवर विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्याध्यापिका संतोषी गुप्ता यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ दिली.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र