विशेष पदकांनी पोलिस अधिकारी, अंमलदारांचा पालकमंत्र्याच्या हस्ते गौरव

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
वाशीम

Washim Police दीर्घकालीन, निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी वाशीम जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांचा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १५ ऑगस्ट रोजी झालेल्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध पदके प्रदान करून गौरव करण्यात आला.
 

Washim Police Officers Honoured with Special Service Medals on Independence Day 
महाराष्ट्र पोलिस दलात प्रदीर्घ, उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवा बजावणार्‍या अधिकारी व अंमलदारांना प्रदान करण्यात येणारे ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ हे १४ ऑगस्ट रोजी जाहीर झाले होते. १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेची दखल घेत पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्यासह अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. या सन्मानार्थीमध्ये पोलिस उपनिरीक्षक दिलीप घोडाम यांच्यासह प्रमोद जाधव, संदीप वानखडे, संतोष कंकाळ, गजानन अवगळे, प्रशांत बक्षी, संतोष पाईकराव, दीपाली पाटील, अरविंद राठोड, रामहरी चवढाळ, प्रशांत राजगुरु, आशिष जैस्वाल, रेशमा ठाकरे, योगेश शर्मा, नागेश देशमुख, महेश वानखडे, अमिर युसुफखान आणि सचिन देशमुख यांचा समावेश आहे. दरम्यान, गोंदिया व गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये खडतर सेवा बजावल्याबद्दल सईद रेघीवाले, तेजस खंडारे, मकरंद घुगे आणि माया डोंगरे यांना विशेष सेवा पदकाने गौरविण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांचा यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची विशेष उपस्थिती होती.