चंद्रपूर,
Woman police constable killed in accident जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात महिला पोलीस शिपाई विशाखा बनसोड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वलनी-बोर्डा वळणावर दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. पोलीस मुख्यालयात आयोजित उजळणी अभ्यासक्रमासाठी चंद्रपूरकडे जात असताना विशाखा बनसोड यांच्यावर काळाने घाला घातला.विशाखा बनसोड यांची नुकतीच नागभीड तालुक्यातील तळोधी-बाळापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. जिल्हा पोलीस मुख्यालयातील उजळणी अभ्यासक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्या कारने चंद्रपूरकडे निघाल्या होत्या. मात्र, वलनी-बोर्डा वळणावर दोन वाहनांची जोरदार धडक झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. विशाखा बनसोड यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली असून, बनसोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.