दहा हजार कोटींचा घोटाळा

मुंबई व भोपाळमध्ये ईडीचे छापे; सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा जप्त

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |

 

नवी दिल्ली
money-laundering-act अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नवी दिल्ली येथील मुख्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत १३ ते १६ ऑगस्टदरम्यान मुंबई आणि भोपाळमध्ये छापे टाकले. तपास यंत्रणेने समीर अग्रवालसह त्याच्या साथीदारांशी संबंधित अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रतिष्ठाणांवर ही छापेमारी केली़ हे छापे सागा ग्रुप पॉन्झी घोटाळ्याच्या संदर्भात टाकण्यात आले़ ज्यात लोणी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि तिच्याशी संलग्न असलेल्या इतर सहकारी संस्थांचा समावेश होता.
 
money l
 
अधिकाऱ्यानुसार, आरोपींनी लोकांना ३-५ वर्षांत तिप्पट परतावा आणि कार भेट देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रयत्नात त्यांनी फसवणुकीने १०,००० कोटी रुपये जमवले. शोध मोहिमेदरम्यान, ईडीने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्रे जप्त केली. गुन्ह्यातून मिळालेली रक्कमही गोठवण्यात आली आहे. यामध्ये सूचीबद्ध शेअर्स आणि सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड, एलआयसी पॉलिसी, बँक बॅलन्स इत्यादींचा आणि ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नऊ महागड्या वाहनांचा समावेश आहे. याशिवाय, ईडीने १.५३ कोटी रुपये रोख, अंदाजे ३५ लाख रुपयांचे विदेशी चलन आणि ५.२५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीच्या विटा जप्त केल्या आहे.प्रत्यक्षात कोणतीही व्यावसायिक हालचाल नव्हती

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमधील पोलिसांनी एलयूसीसी आणि तिच्याशी संलग्न असलेल्या सहकारी संस्थांच्या गटाविरुद्ध दाखल एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. या एफआयआरमध्ये आरोप होता की, २००९ पासून, समीर अग्रवाल (सागा) ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या आवर्ती ठेवी, मुदत ठेवी आणि मासिक उत्पन्न योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जात होते. लोकांना तीन ते पाच वर्षांत दुप्पट किंवा तिप्पट परताव्याच्या हमीसह कारसारख्या भेटवस्तू देण्याचे आश्वासन दिले जात होते.

 
५० हून अधिक बनावट कंपन्यांचे जाळे

सुरुवातीला, गुंतवणूकदारांना काही रक्कम अदा करण्यात आली़ परंतु बहुतांश गुंतवणूक समीर अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी वैयक्तिक फायद्यासाठी केली होती. एजंट, साथीदार आणि बाजार एजंटांना कमिशनच्या स्वरूपात पैसे वळवण्यात आले. जनतेकडून गोळा केलेला बहुतेक निधी रोख स्वरूपात गोळा केला गेला. त्यानंतर प्रवर्तकांनी भारत आणि विदेशातील जंगम आणि स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याच्या नावाखाली हा निधी वळवण्यासाठी बनावट कंपन्या आणि हवाला चॅनेलचा वापर केला. तपासात संचालनालयाने ओळखलेल्या ऑपरेटर्सद्वारे नियंत्रित अशा ५० हून अधिक बनावट कंपन्यांचे एक मोठे जाळे उघड झाले आहे.