भारत विद्यालयात अखंड भारत दिवस उत्साहात

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
हिंगणघाट,
akhand-bharat-diwas : स्थानिक भारत विद्यालयात १४ रोजी अखंड भारत दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापक मनीषा कोंडावार, पर्यवेक्षक नीलाक्षी बुरीले, सिंधू नंदनवार, विनोद नांदुरकर, त्रिशूल लोंढेकर आदी उपस्थित होते.
 
 
hgt
 
 
 
या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक विनोद नांदुरकर यांनी भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकता कशी अबाधित राहिली याबद्दल सविस्तर विवेचन केले. विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य आहे आणि ते जपण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याची असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
त्रिशूल लोंढेकर यांनी १४ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताच्या फाळणीच्या इतिहासाशी जोडलेला आहे. फाळणीच्या काळात लाखो लोकांना आपली घरे सोडून विस्थापित व्हावे लागले आणि अनेकांना प्राण गमवावे लागले. या वेदनादायी इतिहासाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे, हा या दिवसामागील एक महत्त्वाचा विचार आहे. अखंड भारत ही संकल्पना केवळ भौगोलिक सीमांपुरती मर्यादित नसून आपल्या सामायिक इतिहास, संस्कृती आणि परंपरांशी जोडलेली आहे. आपल्या विचारप्रवाहातही भारतीय समाजाच्या सांस्कृतिक एकात्मतेला विशेष महत्त्व असले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषण सादर केले. संचालन व आभार प्रदर्शन अपर्णा धारकर यांनी केले.