बालजगतच्या अंत्योदय उपक्रमातून इंग्रजी संभाषणाचा आत्मविश्वास

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
नागपूर
Antyodaya activities दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगत, लक्ष्मीनगर येथे अंत्योदय उपक्रमांतर्गत आयोजित इंग्लिश स्पीकिंग शिबिराचा समारोप शुक्रवारी (१४ ऑगस्ट) उत्साहात झाला. मेधा कासखेडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात अहिल्या मंदिर येथील १४ आणि श्रद्धानंद अनाथालयातील २२ अशा एकूण ३६ मुलींना इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण देण्यात आले.
 
 
बळ
 
 
 
 
समारोप कार्यक्रमाला अपेक्स मॉन्टेसरी अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मुख्याध्यापिका जानकी गणेश, दीनदयाल शोध संस्थानचे प्रधान सचिव निखिल मुंडले, अंत्योदय संयोजक जयंत जोशी आणि बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थिनींनी गीत तसेच ‘किताबो की उडान’ हे नाटक सादर केले. काही विद्यार्थिनींनी शिबिरातील अनुभवही व्यक्त केले.
जयंत जोशी यांनी व्यक्तिमत्त्व व कौशल्य विकासासोबत विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगितले. जानकी गणेश यांनी बालजगतने विद्यार्थिनींना इंग्रजी शिकण्यासाठी व आत्मविश्वासाने बोलण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनाचे कौतुक केले.निखिल मुंडले यांनी केवळ ३० दिवसांत विद्यार्थिनींनी इंग्रजीचे ज्ञान आत्मसात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरातील विद्यार्थिनी श्रावणी तेलरांधे व इल्याले यांनी केले. 
सौजन्य:सायली जतकर,संपर्क मित्र