ना. बावनकुळे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी वॉर रुमचे उद्घाटन

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
वर्धा, 
chandrashekhar-bawankule : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी वॉररुमचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
 
j
 
 
 
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते. उद्घाटनानंतर महसूल मंत्री व पालकमंत्र्यांनी वॉररुम तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स रुमची पाहणी केली. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सादरीकरणाद्वारे वॉररुममध्ये करण्यात येणार्‍या कामांची माहिती सादर केली. या वॉररुममधून एकात्मिक निरीक्षण व सनियंत्रण केले जाणार आहे. डेटा आधारित निर्णय प्रक्रिया, अंमलबजावणीचा मागोवा आणि जिल्हा विकासाच्या प्राधान्यक्रमांसाठी हे एक समन्वयित केंद्र असणार आहे. याठिकाणी विकासात्मक नियोजन आणि कृतीसंगम, प्रकल्प प्रगती व आढावा डॅशबोर्ड, धोरण निर्मिती व समस्या निवारण, नवीन प्रकल्पांची संकल्पना व आराखडा निर्मिती, माहिती व्यवस्थापन व नियंत्रण, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास वॉर रुमची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
वॉररुममधून वैनगंगा- नळगंणा नदीजोड प्रकल्प, शक्तिपीठ महामार्ग, नीती आयोगाचा आकांक्षित तालुका कार्यक्रम तसेच मित्राच्या महास्ट्राईड प्रकल्पाचे सनियंत्रण केले जाणार आहे.