गौमांस बाळगणार्‍या आरोपीला न्यायालयाचा दणका

3 वर्षाची सक्तमजुरी: दंडही ठोठावला

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
सडक अर्जुनी,
accused possessing beef गौमांस विक्री करणार्‍या आरोपीला सडक अर्जुनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दणका दिला असून 17 ऑगस्ट रोजी न्यायाधीश प्रियंका काजळे यांनी आरोपीला 3 वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. अक्रम अब्दुल रशीद कुरेशी, (43) रा. सडक अर्जुनी असे आरोपीचे नाव आहे.
 
 
accused possessing beef
 
27 ऑक्टोबर 2019 रोजी गुप्त माहितीच्या आधारे डुग्गीपार पोलिसांनी सडक अर्जुनी येथील आरोपी अक्रम अब्दुल रशीद कुरेशी याच्या राहत्या घरी गौमांस विक्री करीत असल्याचे समजल्यावर छापामार कारवाई करून पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरातील फ्रिजमध्ये अंदाजे 50 किलो गौमांस मिळून आले होते. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार हरिचंद्र शेंडे यांनी केला. दरम्यान, सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
 
 
या प्रकरणी दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने कलम 429 भा.दं.वि. अन्वये 3 वर्षे सक्त मजुरी व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त सक्त मजुरी, कलम 5(ब) सह कलम 9 प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये 3 वर्षे सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त मजुरी, कलम 5(क) सह कलम 9(अ) अन्वये 1 वर्ष सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस अतिरिक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे पुनम लेकरीया व ओमप्रकाश गहाणे यांनी युक्तिवाद केला, तर कोर्ट पैरवी पोलिस हवालदार चंदर गुटे यांनी केली.