जनावरांपासून बचावासाठी लावलेले विद्युत उपकरण ठरले जीवघेणे

विद्युत धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
protection-against-animals : तालुक्यातील वनोजा येथे जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या विद्युत उपकरणाची वायर तपासत असताना विजेचा जोरदार धक्का लागून एका शेतकèयाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, 16 ऑगस्ट रोजी घडली. मधुकर बापुराव भालेराव (वय 48) असे मृत शेतकèयाचे नाव आहे.
 
 
 
jk
 
 
 
गेल्या काही दिवसांपासून वनोजा परिसरातील शेतात जंगली जनावरांचा उपद्रव वाढला होता. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने जंगली जनावरे शेतात येऊ नयेत, यासाठी मधुकर भालेराव यांनी शेतात आवाज करणारे विद्युत उपकरण बसविले होते.
 
 
रविवारी हे उपकरण सुरू होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यामध्ये काही बिघाड झाला आहे का, हे पाहण्यासाठी मधुकर भालेराव शेतात गेले. उपकरणाची वायर तपासत असतानाच त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
 
घटनेची माहिती मिळताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथे पाठविला.
 
 
मधुकर भालेराव यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने पत्नी व दोन मुलांवर मोठे संकट ओढवले असून, या घटनेने संपूर्ण वनोजा गावावर शोककळा पसरली आहे.
 
 
या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामस्थांनी भालेराव कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार, तत्काळ आर्थिक मदत व मदत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. वनोजा परिसरात जंगली जनावरांचा वाढता उपद्रव व शेतांमध्ये वापरल्या जाणाèया असुरक्षित विद्युत जोडण्यांमुळे शेतकरी जीव मुठीत धरून शेती करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वनविभागाने जंगली जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच महावितरणने शेतातील विद्युत जोडण्यांची सुरक्षा तपासणी करून धोकादायक जोडण्या तत्काळ दुरुस्त कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.