घरबसल्या उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
नागपूर (रामटेक )
Kalidasa Sanskrit University कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत घरबसल्या पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनुसार ४६ विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.या केंद्रामार्फत बी.ए., एम.ए.सह संस्कृत, योगशास्त्र, भगवद्गीता, ज्योतिष, वास्तुशास्त्र, वेद, भारतीय तत्त्वज्ञान, वैदिक गणित, उपनिषद, कर्मकांड, कीर्तनशास्त्र आदी विषयांतील पदविका, प्रमाणपत्र व इतर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
 
 
   

kaliविद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन, अभ्यास साहित्य, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन व शंका समाधानाची सुविधा मिळणार आहे. नोकरी करणारे, गृहिणी, ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच नियमित महाविद्यालयात शिक्षण घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही उपयुक्त संधी आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य:वर्षा मसुरकर,संपर्क मित्र