स्टेजवर जॅकेट फेकताच करण औजलाचा पारा चढला

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
अमेरिका
karan aujla पंजाबी संगीतविश्वातील सुपरस्टार करण औजला सध्या आपल्या आंतरराष्ट्रीय ‘पी–पॉप कल्चर टूर’मुळे चर्चेत आहे. त्याच्या आवाजावर जगभरातील चाहते थिरकत असताना ऑस्ट्रेलियातील एडिलेड येथील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मात्र अनपेक्षित प्रकार घडला. करणचे लाइव्ह परफॉर्मन्स सुरू असताना गर्दीतील एका चाहत्याने स्टेजच्या दिशेने जॅकेट भिरकावले. हा प्रकार करणला अजिबात आवडला नाही आणि तो संतापला. या हाय व्होल्टेज ड्राम्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे
 
 

karan aujla adelaide show: singer loses cool after fan throws jacket on st
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, ही घटना १६ ऑगस्ट रोजी एडिलेड एंटरटेनमेंट सेंटर एरिना येथे घडली. करण औजला स्टेजवर जोरदार परफॉर्मन्स देत असताना गर्दीतील एका व्यक्तीने त्याच्या दिशेने जॅकेट फेकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे करण काही क्षण अवाक् झाला आणि त्याचा पारा चढला. त्याने लगेच गाणे थांबवले आणि पंजाबी भाषेत त्या चाहत्याला सुनावण्यास सुरुवात केली.
जॅकेट स्टेजवर येताच करणने संताप व्यक्त करत संबंधित चाहत्याला थेट आव्हान दिले. ‘एका बापाचा असशील तर समोर ये,’ अशा आक्रमक शब्दांत त्याने त्याला सुनावले. करणचे हे रूप पाहून कार्यक्रमातील वातावरण काही काळ शांत झाले. ज्या चाहत्याने जॅकेट फेकले होते, त्याची ओळख पटवल्यानंतर करणने त्याला, “तू प्रेमात पडला आहेस का? तू वेडा झाला आहेस का?” असा सवालही केला.यानंतर करणने चाहत्याला समजावताना आपण येथे कोणाची थट्टा-मस्करी करण्यासाठी आलेलो नसल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे स्वतःचा तसेच इतरांचाही वेळ वाया जात असल्याचे त्याने स्पष्ट केले. सुरुवातीला संतापलेल्या करणने काही वेळाने मात्र आपला संयम दाखवत मोठे मन केले.चाहत्याला शांत करत करणने, ‘डार्लिंग, असं करू नकोस. मला माहिती नाही तू प्रेमात आहेस की रागात; पण ही पद्धत नाही. दे ते जॅकेट, मी त्यावर ऑटोग्राफ देतो,’ असे म्हटले. त्यामुळे काही वेळापूर्वी संतापलेला करण अखेर चाहत्याशी सौम्यपणे वागताना दिसला.एडिलेडमधील या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, करणच्या आक्रमक प्रतिक्रियेसोबतच त्याने शेवटी दाखवलेल्या संयमाचीही चर्चा होत आहे.