‘एकता’ मासिकाच्या प .बंगाल विशेषांकाचे प्रकाशन

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
मोतीबाग
ekta-magazine एकता मासिकाच्या प .बंगाल विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मा . भय्याजी जोशी यांच्या हस्ते  मोतीबाग येथे करण्यात आले.

ekata
 
एकता मासिकाचा ऑगस्ट महिन्याचा अंक पश्चिम बंगाल विशेषांक आहे. या अंकात पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास मांडणारे लेख तर आहेतच , शिवाय तेथील प्राचीन विद्यापीठे , सण - संस्कृती - कला , खाद्यपदार्थ, सुरक्षा अशा अनेक विषयांवर लेख आहेत.
या अंकात भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सह - संघटन मंत्री गणेश मिश्रा यांची विस्तृत मुलाखत असून निवडणूकीत भाजपच्या यशामागील कारणे , संघाचे योगदान आणि भा . म . संघाचा समन्वय याविषयी त्यांनी आपले विचार मांडले आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ वामन पारखी , माजी सनदी अधिकारी उपस्थित होते. मा . नाना जाधव प . प्रांत संघचालक , राजीव जोशी , अध्यक्ष भारतीय संस्कृती संवर्धक संस्था, ॲड . प्रशांत यादव , भाग संघचालक , कसबा भाग, रुपाली भुसारी , संपादक एकता मासिक हे उपस्थित होते.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वज वंदन आणि भारतमाता पूजन झाले.डॉ वामन पारखी आणि भय्याजी जोशी यांचे उद्बोधन झाले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.