मूल-चंद्रपूर महामार्ग झाला खड्डेमुक्त

आ. मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर,
mla mungantiwar मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वरील जीवघेणे खड्डे आणि रस्त्याची झालेली दूरवस्था दूर करून हा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. गडकरी यांनी प्रतिसाद दिला आणि प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर महामार्गावरील खड्डे बुजविण्यात असून, काही पॅचेस आणि शोल्डर वर्कचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
 
 
mla mungantiwar
 
मूल-चंद्रपूर महामार्गाची दूरवस्था, वाढता अपघातांचा धोका आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच हा प्रश्न गांभीर्याने घेतला. नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे महामार्गाच्या दुरुस्तीची तातडीची मागणी करण्यात आली. त्यानंतर 6 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविणे, आवश्यक त्या ठिकाणी पॅचेस वर्क करणे तसेच शोल्डर वर्क पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. 15 ऑगस्टपूर्वी आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्याची मुदतही त्यांनी दिली होती.
 
 
या बैठकीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित कंत्राटदाराला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक यंत्रसामग्री व रोड मटेरियल उपलब्ध करून महामार्गावरील खड्डे बुजविणे, पॅचेस करणे आणि दोष निवारणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील खड्डे बुजविण्यात आले असून, महामार्गाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी आ. मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता केळकर यांच्यासोबत मूल-चंद्रपूर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.