वरोडा,
ordering a cow online वरोडा शहरातील एका सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकार्याने इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर नियमित भरपूर दूध देणारी गाय बघितली आणि तशी मागणी नोंदवली. गाय तर आलीच नाही, मात्र ऑनलाईन गाय बोलावण्याच्या नादात संबंधित अधिकार्याची लाखो रुपयांची फसवणूक झाली.
वरोडा शहरातील एका सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकार्याने दररोज 20 लिटर दूध देणार्या गाईची जाहिरात इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर बघितली. त्यामध्ये संबंधित व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला होता. त्यावर संपर्क करताच विक्रेत्याने गाईचे फोटो पाठविले आणि गाय घरी पोहोचताच पैसे द्या, असे सांगितले. त्यानंतर आठ दिवसांनी विक्रेत्याने संपर्क केला आणि गाय हरियाणा येथून निघाली असून, त्याकरिता अकरा हजार रुपये बुकिंग राशी पाठवा, असे सांगितले. त्यानंतर गाय असलेल्या वाहनाला अपघात झाला असून, 25 हजार रुपये पाठवा असे सांगितल्यावर त्याच्या खात्यात पैसे पाठविण्यात आले.ordering a cow online नंतर गाडीला अपघात झाल्याचे सांगत एकूण 1 लाख 15 हजार रुपये भामट्याने उकळले. अखेर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच संबंधित अधिकार्याने ऑनलाइन तक्रार सायबर गुन्हे शाखेकडे केली. वरोडा पोलिस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.