टाकळी तलावात तीन मुले बुडाली

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
children-drowned : तालुक्यातील टाकळी येथील तलावात सोमवार, 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी अंदाजे 4 च्या सुमारास तीन मुले बुडाल्याची माहिती समोर आली आहे. बुडालेल्या मुलांमध्ये पीयूष यादव, प्रथमेश यादव व प्रसाद सातपुते तिघेही रा. यवतमाळ यांचा समावेश आहे.
 
 
 
children-drowned
 
 
 
तलाव परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. घटनेमुळे टाकळी तसेच यवतमाळ परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबियांत चिंतेचे वातावरण आहे. तलावात नेमक्या कोणत्या परिस्थितीत तिन्ही मुले बुडाली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्रशासन व बचाव पथकाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.