सावनेरमध्ये ४०० एनसीसी कॅडेट्सची ‘तिरंगा’ रॅली

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
नागपूर,
tiranga rally स्वातंत्र्यदिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त सावनेर येथे आयोजित ‘कॅटसी-६१५’ (CATC-615) शिबिरात सहभागी झालेल्या २ महाराष्ट्र आर्मर्ड स्क्वॉड्रन एनसीसी, नागपूरच्या ४०० कॅडेट्सनी शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबत जनजागृती रॅली काढली. राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच प्रत्येक नागरिकाने अभिमान आणि देशभक्तीच्या भावनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, हा रॅलीचा मुख्य उद्देश होता.
 
tiranga rally
 
या जनजागृती रॅलीला सावनेरमधील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक स्वयंसेवकांनी कॅडेट्सचे स्वागत करत त्यांना मिठाईचे वाटप केले. या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला. एनसीसी कॅडेट्सच्या या रॅलीमुळे सावनेरमधील स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वाढला असून, ‘हर घर तिरंगा’चा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.