वडनेर,
wife-murders-husband : हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापूर (बाई) येथे चार दिवसापूर्वी खुन करण्यात आल्याची घटना आज १८ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
गावकऱ्यांच्या चर्चेनुसार, मरणारा आणि मारणारा हे चुलत भाऊ असून मृतकाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते, असे बोलल्या जात आहे. घटनेच्या दिवशी दोघेही एकत्र आढळून आले तेव्हाच पत्नी आणि दिराने संगणमत करून त्याचा खून केला आणि गावालगतच्या विहिरीत त्याचा मृतदेह टाकून दिल्याची माहिती खुद मृतकाच्या पत्नीने दिल्याची गावकऱ्यांना सांगितल्यावरून सदर घटनेचा गावकऱ्यांनी शोध घेतल्यामुळे खुनाची घटना उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.
गावकऱ्यांच्या चर्चेनुसार, स्वातंत्र्यदिनी खुन करून मारण्यात आलेला संतोष पांडुरंग कैकाडे वय 42 हा घटनेच्या दिवशी भजन पूजन करून रात्रीच्या वेळेस घरी आला होता. मात्र, घरी पत्नी आणि आरोपी शुभम रमेश कैकाडे वय 35 हा पत्नीसोबत आढळून आला. त्यानंतर पत्नीने आणि दीर शुभमने संगनमताने संतोषला जीवनाशी मारून टाकले. या प्रकरणी कोणालाही थांगपत्ता न लागू देत त्याचा मृतदेह गावाबाहेरील विहिरीत टाकून दिला.
मात्र, प्रेम संबंध असल्याचे कारणावरून संतोष कैकाडे हा गेल्या तीन दिवसापासून घरी नसल्याने आधीच याविषयी भनक असलेल्या गावकऱ्यांना संशय आला. आज मात्र, मृतकाच्या पत्नीने तो गावाबाहेर विहिरीत असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानुसार सदर प्रकरण वडनेर पोलीस ठाण्यात पोहोचले या प्रकरणी वडनेर पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे.