मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा

१५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहात रील्स स्पर्धेचे आयोजन

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
भंडारा,
reel for soil and water conservation माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६ हा कालावधी 'जलसंधारण सप्ताह' म्हणून राबविण्यात येणार आहे. या दरम्यान मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे‘ आयोजन करण्यात आले आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी 'रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत युवक - युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.
 
 
reel for soil and water conservation
 
 
यानिमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या सप्ताहात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. सहभागी स्पर्धकांनी व्हिडीओ/रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ/ रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धकांने तयार केलेली Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.
रिल्स बनवण्यासाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य हे विषय देण्यात आले आहेत.
रील्स करीता गुणांकन पद्धती पुढीलप्रमाणे आहे.
विषय व संदेश-३० गुण,
कल्पकता-२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश-२० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता-१५ गुण, Instagram Engagement -१० गुण
असे एकूण - १०० गुण असणार आहेत. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि सोशल मीडिया एंगेजमेंट या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.
राज्यासाठी एकच अधिकृत #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.reel for soil and water conservation रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे
"एक रील ... मातीसाठी !, एक रील ... पाण्यासाठी !, एक रील ... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.
वरील स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.