वर्धा,
178 lakhs excluded from voter list मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी अंतिम मुदतीत १७ ऑगस्टपर्यंत घरोघरी भेट देऊन स्वाक्षरीसह गणना पत्रक भरून घेतले. जिल्ह्यात ८४.३४ टक्के काम पूर्ण झाले असून गैरहजर, स्थलांतरीत, दुबार मतदार तसेच मृत मतदार अशा एकूण १ लाख ७८ हजार मतदार मतदार यादीतून बाद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ११ लाख ३७ हजार २४२ मतदार असून त्यापैकी ९ लाख ५९ हजार १११ इतक्या मतदारांचे गणना पत्रक स्वाक्षरी होऊन प्राप्त झाले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघातील ३१० मतदान केंद्रातील २ लाख ६४ हजार ८५७ मतदारांपैकी २ लाख २७ हजार ५७६ गणना पत्रक, देवळी मतदार संघातील ३३५ मतदान केंद्रातील २ लाख ७२ हजार ६१ मतदारांपैकी २ लाख २६ हजार ४३३ गणना पत्रक, हिंगणघाट मतदार संघातील ३५१ मतदान केंद्रातील ३ लाख ४०४ मतदारांपैकी २ लाख ५२ हजार ५३४ गणना पत्रक व वर्धा मतदार संघातील ३४६ मतदान केंद्रातील २ लाख ९९ हजार ९२० मतदारांपैकी २ लाख ५२ हजार ५६८ मतदारांचे गणना पत्रक भरून व स्वाक्षरी घेऊन जमा करण्यात आले आहे.
मतदारांच्या गृहभेटीनंतर १ लाख ७८ हजार १३१ इतके मतदार गणना पत्रक जमा न होणे या प्रवर्गात नोंदविण्यात आले आहे. आर्वीत गैरहजर ३ हजार ५२२, कायस्वरुपी स्थलांतरीत २० हजार ६६८, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार ४ हजार १६९, मृत ८ हजार ८७४, इतर ४८ असे ३७ हजार २८१ मतदार आढळून आले. देवळीत गैरहजर १ हजार ३०४, कायमस्वरुपी स्थलांतरीत २२ हजार ८०९, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार ९ हजार १८, मृत १२ हजार ४२५, इतर ७२ असे ४५ हजार ६२८ मतदार आढळून आले. हिंगणघाटमध्ये गैरहजर ४ हजार ११०, कायमस्वरुपी स्थलांतरीत २४ हजार ९०७, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार ४ हजार ३८८, मृत १४ हजार ४०६, इतर ५९ असे ४७ हजार ८७० मतदार आढळून आले.
वर्धेत गैरहजर १ हजार ३६७, कायमस्वरुपी स्थलांतरीत २६ हजार ७३५, अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार ७ हजार १९८, मृत ११ हजार ९७२, इतर ८० असे ४७ हजार ३५२ मतदार आढळून आले. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील ११ लाख ३७ हजार मतदारांना १०० टक्के गणनापत्रक वितरीत करण्यात आले असून गणना पत्रक जमा न झालेल्या नावाच्या याद्या संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.