नवी दिल्ली
chatgpt आजकाल चॅटजीपीटीचा वापर करणाèयांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच याचा वापर करतात. पण, चॅटजीपीटीने आता किशोरांना अभ्यासासाठी मदत होईल, याकरिता नवे व्हर्जन आणले आहे.
चॅटजीपीटी फॉर टीन्स असे या मोडचे नाव असून हे स्वतंत्र अॅप स्वरूपात नाही, तर चॅटजीपीटीमध्येच हा वेगळा पर्याय दिला आहे. हा मोड 13 ते 17 वयोगटातील मुलांसाठी तयार केला आहे. चॅटजीपीटीचा हा मोड किशोरवयीन मुलांना त्या धोक्यांपासून वाचविण्यासाठी बनवण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याला नुकसान होऊ शकते. चॅटजीपीटी फॉर टीन्स मुलांना अशा गोष्टींपासून दूर ठेवेल, जे जाणून घेण्याची त्यांना सध्या गरज नाही.
चॅटजीपीटीला प्रश्न विचारल्यानंतर तो सगळी माहिती देतो. पण, काही वेळा अशीही माहिती त्याच्याकडून दिली जाते, जी किशोरवयीन मुलांना देणे धोकादायक ठरू शकते. अशाच माहितीपासून आता हे नवीन व्हर्जन सुरक्षित ठेवणार आहे.
चॅटजीपीटी फॉर टीन्सचे नियंत्रण पालक स्वत:कडेही ठेवू शकणार आहेत. पालकही यातील सेटिंग्जमध्ये जाऊन काही बदल करू शकतील.