विद्यार्थिनीकडून देहव्यवसाय करवून घेणारी महिला अटकेत

भगत नगरमध्ये गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
bhagat nagar कलमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भगतनगर परिसरात पैशांचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनी व विवाहित महिलेकडून देहव्यवसाय करवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला लक्ष्मी किशोर कुर्रे (३६) हिला अटक केली.

bhagat nagar
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, भरतवाडा रोडवरील भगत नगर परिसरात आरोपी महिला दलाल ही मुली व महिलांना अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी दुपारी सुमारे २.२५ वाजता एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून पाठवले. देहव्यवसायाचा सौदा निश्चित होताच बनावट ग्राहकाने पोलिस पथकाला इशारा केला. त्यानंतर दोन पंच साक्षीदारांसह पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईदरम्यान तेथे आढळून आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची आणि एका विवाहित महिलेची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी कलमना पोलिस ठाण्यात आरोपी लक्ष्मी कुर्रे हिच्याविरुद्ध संबंधित कलमांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (पीटा ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तक्रार नोंदवली असून पुढील तपास कलमना पोलिस करीत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दर्शन पाटील, हवालदार लक्ष्मण चौरे, प्रकाश माथनकर