प्रेयसीचा खून करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

बेलतरोडीतील हॉटेल मधील घटना

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Girlfriend Murder बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगरातील एका हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीचा चाकूने भोसकून खून केला आणि स्वतःवरही हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून जखमी युवकाला उपचारासाठी मेडिकल रुग्णांना दाखल केले आहे. शिवानी राजानंद गजभिये (वय २८) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर किरण संजय आत्राम (वय ३०) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
 

प्रेयसीचा खून करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी गजभिये ही अजनीतील शताब्दी चौकात राहते. तर, गंभीर जखमी किरण आत्राम अजनीच्या रेल्वे वसाहतीत राहतो. दोघेही रेल्वे विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. मनीषनगरातील अजित बेकरीमागे हॉटेल स्टेरियस आहे. मंगळवारी रात्री हे दोघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी रूम भाड्याने घेतली. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास अचानक त्यांच्या रूममधून Girlfriend Murder आरडाओरडा ऐकू येऊ लागल्या. हॉटेल व्यवस्थापकाने तिकडे धाव घेतली. आतमध्ये शिवानी गजभिये तसेच किरण आत्राम रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. बाजूलाच चाकू पडून होता. हे दृश्य पाहून हॉटेल व्यवस्थापनाने बेलतरोडी पोलिसांना कळविले. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. शिवानी गजभियेचा मृत्यू झाला होता. संशयित किरण गंभीर अवस्थेत होता. दोघांनाही पोलिसांनी मेडिकलमध्ये पाठविले. डॉक्टरांनी किरणवर तातडीने उपचार सुरू केले.
 
 
 
याप्रकरणी जखमी प्रियकर किरण आत्राम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असून या हत्यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पुढील तपास बेलतरोडी पोलीस करीत आहे.