पोलिस असल्याचे सांगून २ लाखांचे सोने केले लंपास

साकोलीची तलाव रोडवरील घटना

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
साकोली,
gold worth 2 lakh stolen आम्ही पोलिस कर्मचारी आहोत, सध्या सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत, असे सोने अंगावर घालून फिरू नका, तुमचे दागिने काढा व या पुडीत सुरक्षित ठेवा, असे बोलून दोन तोतया पोलिसांनी एका व्यक्तीला थांबवून दोन लाख रुपये किंमतीचे दागिणे लंपास केले. या प्रकरणी पिडीताने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून आता बनावट पोलिसांचा शोध सुरु आहे.
 
 
gold worth 2 lakh stolen
 
१८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:१५ च्या दरम्यान साकोली तलाव वार्ड निवासी गुलाब छगन कापगते, वय ५९ हे आपल्या दूचाकी क्र. एम एच ४९ बीएफ २७७२ ने पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून तलाव बायपास मार्गाने घरी जात होते. तेथे दोन इसम रेनकोट व डोक्याला हेलमेट, तोंडाला रुमाल बांधून उभे होते .त्यांनी गुलाब कापगते यांना थांबवून आम्ही पोलिस आहोत. सोन्याचे व चांदीचे दागिणे चोरी होत आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे . दागिणे घालून फिरु नका. दागिणे काढा आणि आमच्याकडे सुरक्षित ठेवा, असे म्हणत कापगते यांच्या अंगावरील सोन्याची साखळी व अंगठी काढून आपल्याकडे घेतली. त्यानंतर दोन्ही दागिणे एका कागदाच्या पुडीत बांधून ती पुडी कापगतेंच्या दूचाकीच्या डिकीत टाकली व सदर अनोळखी इसम मोटारसायकलने एकोडी चौकाकडे गेले.
 
 
कापगते काही अंतरावर गेल्यावर शंका येताच त्यांनी गाडीची डिक्की तपासली असता, पुडीत पिवळया रंगाची साखळी आणि अंगठी होती. गुलाब कापगते यांची २० ग्रॅम सोन्याची साखळी व ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ९० हजाराचे दागिणे नकली पोलिसांनी लंपास केल्याचे लक्षात येताच कापगते यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. साकोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम २०४, ३१८ (४), ३ (५) भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे चोर एकोडी रोड चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिस निरिक्षक आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर मानकर, युवराज वरकडे तपास करीत आहे.