ग्रीन स्काय सोलरने बेरोजगारांना दिला रोजगार-सुदर्शन पांडे

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
नामदेव भदे
sudarshan pandey आजघडीला दैनंदिन जीवनातील बहुतांश उपकरणी व यंत्रे ही विजेवरच चालतात. एसी, कूलर, ओव्हनपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच वाहते वीजदर आणि बदलती मीटर प्रणाली यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच व्यावसायिकांच्या वीज देयकांमध्ये मोठी वाढ होत आहे.
 

green sky solar creates jobs for unemployed youth; sudarshan pandey entrepreneurial success story 
या वाढत्या बीज खर्चावर प्रभावी आणि पर्यावरणपूरक उपाय म्हणून सौर ऊर्जा महत्त्वाची ठरत आहे. सौर प्रकल्पाच्या माध्यमातून घरावर किंवा व्यावसायिक इमारतीवर वीज निर्मिती करून स्वतः वापरा असा संदेश देत ग्रीन स्काय सोलरचे संचालक सुदर्शन पांडे यांनी गत दोन वर्षात १२ बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. पंतप्रधान सूर्यचर मोफत वीज योजनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पर्यावरणपूरक अर्थात ग्रीन एनर्जी म्हणून सौर ऊर्जा युनिट लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
ग्रीन स्काय सोलर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुदर्शन पांडे यांनी वर्ष २०२४ मध्ये स्टार्टअप सुरू केले. सुरुवातीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्यांनी परिश्रमाची तयारी दाखवली. टेक्सटाईल आणि आयटी क्षेत्रातील सुमारे २० वर्षांचा अनुभव असल्याने नवीन काही करण्याचा निर्धार केला. पारंपरिक क्षेत्रातील अनुभवाच्चय उपयोग नवीन तंत्रज्ञानाधारित व्यवसायात करून घेण्याचे ठरवीत एमसीईडी-अमृत सूर्यमित्र कार्यशाळेतील मौलिक मार्गदर्शन घेतले, गत दोन वर्षाच्या कालावधीत सुदर्शन पांडे यांनी नागपूर व आसपासच्या परिसरातील शंभरापेक्षा अधिक ग्राहकांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारून दिले आहेत. अनेक ग्राहकांच्या वीज खर्चात मोठी बचत होत आहे. पात्र ग्राहकांना केंद्र शासनाच्च्या योजनेंतर्गत उपलब्ध अनुदानाचाही लाभ मिळवून दिला जात आहे. या वशामागे योग्य तांत्रिक प्रशिक्षण, व्यावस्तविक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत ही महत्त्वाची कारणे असल्याची माहिती सुदर्शन पांडे यांनी दिल्ली.
नवीन क्षेत्रात काम करण्यापूर्वी अनेक sudarshan pandey प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, महाराष्ट्र केंद्र उद्योजक विकास आणि अॅकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग या संस्थांशी संपर्क साधला. उद्योजकतेसाठी आवश्यक मार्गदर्शन घेतले. या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान त्यांनी आपल्या स्टार्टअपमध्ये प्रत्यक्ष वापरले, थिअरीसोक्त प्रॅक्टिकल प्रशिक्षण मिळाल्यामुळे सौर प्रकल्प उभारणी, देखभाल-दुरुस्ती आणि ग्राहक सेवा याबाबत आत्मविश्वास वाढला. हेच प्रशिक्षण उद्योजकीय प्रवासातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरले असल्याचे पाहे सांगतात.गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रवासात आता समाधानकारक प्रगती होत आहे. आज दत्ता ते पंधरा सदस्यांची चमू सीर प्रकल्प उभारणी व संबंधित कामांमध्ये कार्यरत होण्यामागे अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, एमसीईडीचे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी, पंकज ठाकरे आणि करुणा शेंडे आदींचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले. योग्य वेळी योग्य मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण केवळ कागदावर न राहता थिअरीपासून प्रक्टिकालपर्यंत प्रत्यक्ष व्यवसावात उतरविता आले आणि एका नवीन क्षेत्रात स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वास मिळाला. याशिवाय सौर ऊर्जा क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यात यश मिळाले आहे.
ती केवळ एका स्टार्टअपची यशोगाथा नाही, तर प्रशिक्षण, मार्गदर्शन, तांत्रिक कौशल्य, उद्योजकीय दृष्टिकोन सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच आज यशस्वी उद्योजक महणून कार्यरत आहे. महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीज देवकातून मुक्त करण्याचा वा योजनेचा उद्देश आहे. एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० दुनिट वीज निर्माण होऊ शकते. त्यामुळे १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःच्या घरातील वीज गरज सौर ऊर्जेतून भागविण्याची संधी असल्याची माहिती सुदर्शन पांडे यांनी दिली.