चाकुर येथील जि. प. शाळेत त्वरीत भौतिक सुविधा पुरवा

विद्यार्थी यांचा गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
मानोरा,
zilla parishad school in chakur पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या जिल्हा परिषद मराठी शाळा चाकुर येथे कोणत्याही भौतिक सुविधा नाही.त्या मुळे आमच्या शिक्षणावर परिणाम होतो आहे. आम्हाला शिकायचं आहे. अशी आर्त हाक देत विद्यार्थी व पालक १९ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांच्या दालनात तक्रार घेऊन आले.
 
 
zilla parishad school in chakur
 
शाळेच्या परीसरात भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या पूर्वी ६ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती. त्याची दखल घेतली नाही. म्हणून आज पुन्हा पालक व विद्यार्थीनी सयुक्त पणे निवेदन देण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, परिसर स्वच्छ करावा, शौचालय उपलब्ध करून द्यावे, भिंतींना तडे गेले त्या दुरुस्त कराव्या अशी मागणी करण्यात आली. या बाबत माहुली गट ग्रामपंचायत मध्ये असलेल्या चाकुर या गावावर ग्रामपंचायतीने व सचिवाने लक्ष देण्याची सूचना करावी. निवेदनावर आदर्श गायकवाड, वंश गायकवाड, चंचल राठोड, आराध्या राठोड, आदिती राठोड, चैताली बोचर, परी गायकवाड आदींच्या स्वाक्षर्‍या असून विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते.