‘मिर्झापूर : द मूव्ही’चे पहिले गाणे ‘वारूं फॉरेवर’ रिलीज

पुन्हा रंगणार कालीन भैय्या-गुड्डू पंडितांचा थरार

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
मुंबई

Mirzapur क्राइम-थ्रिलरची चर्चा झाली की ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवरील ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. कालीन भैय्यापासून गुड्डू पंडितपर्यंत मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले असून तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच गाजलेल्या मालिकेवर आधारित ‘मिर्झापूर : द मूव्ही’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाची कथा मालिकेपेक्षाही अधिक धोकादायक आणि थरारक असल्याचे सांगितले जात आहे.
 

Mirzapur The Movie Song ‘Varoon Forever’ Released, Shreya Ghoshal and Romy Bring Back the Nostalgia 
काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर : द मूव्ही’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे ‘वारूं फॉरेवर’ रिलीज झाले असून या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अली फजल, पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी आणि श्रिया पिलगांवकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता आहे. त्यातच पहिल्या गाण्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
‘वारूं फॉरेवर’ या रोमँटिक गाण्याला श्रेया घोषाल आणि रोमी यांनी आवाज दिला आहे. हे गाणे ‘मिर्झापूर’ मालिकेतील लोकप्रिय ‘वारूं’ या गाण्याचे नवे व्हर्जन आहे. नव्या स्वरूपात सादर करण्यात आले असले तरी मूळ गाण्याची भावनिक रूह कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे गाणे नवे असूनही प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारे ठरत आहे.
मूळ ‘वारूं’ हे गाणे २०२० मध्ये प्रदर्शित झाले होते. त्यानंतर ते ‘मिर्झापूर’ मालिकेचा अविभाज्य भाग बनले. त्यातील सुरेल आणि भावपूर्ण शब्दांसोबतच शांत, सोलफुल संगीतामुळे हे गाणे चाहत्यांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक ठरले. आता एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने याच गाण्याला नव्या म्युझिकल ट्रीटमेंटसह पुन्हा प्रेक्षकांसमोर आणले आहे.
‘मिर्झापूर : द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे. चित्रपटात अली फजल, पंकज त्रिपाठी, जितेंद्र कुमार, दिव्येंदु शर्मा, श्रिया पिलगांवकर, श्वेता त्रिपाठी, रवि किशन, अभिषेक बनर्जी आणि रसिका दुग्गल हे प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय हर्षिता गौर, मोहित मलिक, राजेश तैलंग आणि शीबा चड्ढा हे कलाकारही चित्रपटाचा भाग आहेत.
दरम्यान, नुकत्याचMirzapur  प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरनेही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे—‘मिर्झापूर : द मूव्ही’मध्ये अखेर कोणाच्या डोक्यावर ताज चढणार? कालीन भैय्याच्या गादीवर रवि किशन यांच्या व्यक्तिरेखेची नजर असल्याचे ट्रेलरमधून दिसून येते, तर मुन्ना आणि गुड्डू यांचाही या सत्तेच्या खेळात महत्त्वाचा डाव असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे चित्रपटात मिर्झापूरच्या गादीसाठी नेमका कोणाचा विजय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘मिर्झापूर : द मूव्ही’ येत्या ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.