कारंजा (घा.),
ncp workers join bjp आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासावर विश्वास ठेवून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकास, जनसेवा आणि संघटन विस्ताराचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करून प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करीत राहू, असा विश्वास शिरीष भांगे यांनी व्यक्त केला. प्रवेशामुळे कारंजा (घा.) परिसरात भाजपा पक्ष संघटनेला निश्चितच नवी ऊर्जा व बळ मिळणार आहे.

जगदीश चाफले, जयश्री चाफले, माजी उपसरपंच रमेश सरोदे, अमोल सरोदे आणि माजी नगरसेवक कल्पना सरोदे आदींसह अनेकांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी चक्रधर डोंगरे, दिलीप जसुतकर, हरिभाऊ जसुतकर, किशोर भांगे, संजय कदम, प्रमोद चव्हाण, सुवर्णा चौधरी, ज्योती यावले, रमा दुर्गे, वैशाली सरोदे, सुवर्णा कावडकर, मीनाक्षी भांगे, गजानन सरोदे, भूपेश बारंगे, सुधाकर दुर्गे, डॉ. रमेश भांगे, सुदीप भांगे, सुनील वंजारी, अजय कावडकर, घनश्याम मेघरे, मनोहर चाफले, राजेश काळबांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.