नागभीड,
one person dies in a tiger attack चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह चिंधिमाल तलाव परिसरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. वनविभागाने मृतदेहाची पाहणी करून परिसराची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोरेश्वर गोपिचंद सावसाकडे (65 रा. तुकूम, तिवर्ला) असे मृतकाचे नाव आहे.
मोरेश्वर सावसाकडे हे 16 ऑगस्टला शेताकडे गेले होते. मात्र रात्र होवूनही घरी परत आले नाही. या बाबतची माहिती वनविभाग व पोलिस विभागाला देण्यात आली होती. गेले चार दिवसांपासून शोधमोहीम सुरु होती. दरम्यान, चिंधिमाल गावाजवळील तलाव परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने मृतदेहाची पाहणी करून परिसराची तपासणी केली असता, त्यांचा मृतदेह वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले.
जनकापूर येथील रमेश जैराम काशिवार यांना 4 ऑगस्ट राजी वाघाने अड्याळमेंढ परिसरात ठार केल्याच्या घटनेला 15 दिवस होत नाही, तर चिंधिमाल परिसरात वाघाने पुन्हा एका व्यक्तीला ठार केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिकांना जंगल व वनक्षेत्रालगत एकट्याने न जाण्याचे आवाहन केले आहे.
जनकापूर परिसरातील अड्यरळमेंढा, नवेगाव रिठ, चिंधिमाल या परिसरात वाघाचा वावर असून, वाघाला जेरबंद करण्यााठी तीन ठिकाणी लाइव्ह कॅमेरे लावण्यात आले आहे. वन अधिकार्यांसह 30 वनमजूर 5 ऑगस्टपासून गस्तीवर आहेत. मात्र 15 दिवस होवूनही वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, असी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.