सहकार भारतीचा सहकार संवाद

एकत्रितपणे काम करण्याचे विवेक जुगादे यांचे आवाहन

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
हिंगणघाट,
sahakar bharatis cooperative dialogue वर्धा जिल्हा सहकार भारती, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अभिनव महिला बचत गट यांच्या संयुत वतीने सहकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रामदास आंबटकर योग भवन येथे करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर विचार मंथन व मुत संवाद करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर होत्या. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश सहकारी भारतीचे महामंत्री तथा राज्य सहकारी धोरण उच्चस्तरीय समितीचे सदस्य विवेक जुगादे, विभागीय सहनिबंधक सदानंद उईके होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी उपस्थित होते.
 
 
sahakar bharatis cooperative dialogue
 
यावेळी विवेक जुगादे यांनी सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे. सहकाराच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी नि:स्वार्थ भावनेने व प्रामाणिकपणे कार्य करून या कार्यासाठी इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला हिंगणघाटचे सहाय्यक निबंधक स्वप्नील पुराम, सहकार भारतीचे नागपूर विभाग प्रमुख संजय रोकडे, प्रदेश सचिव विनोद भीमनवार, सहकार भारती वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर कोळसे, महामंत्री श्यामकुमार खत्री, संघटन मंत्री मनोज पाचखेडे, सहसंघटन मंत्री प्रशांत मुळे, वर्धा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर घवघवे, मंजिरी देशकर, भास्कर थोटे, गजानन खाडे, शेखर मेंढेवार उपस्थित होते.
 
 
प्रास्ताविक श्यामकुमार खत्री यांनी केले. संचालन प्रा. लिना शेंडे यांनी तर आभार प्रभाकर कोळसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी हिंगणघाट तालुका सहकार भारतीचे अध्यक्ष रामदास खेकारे, महामंत्री नंदकुमार सिंगरु, संजय तराळे, सपना जाना, प्रा. लिना शेंडे, चंदनखेडे, शेखर दाते, कांचन खत्री, अभिनव विचार मंच हिंगणघाटचे अध्यक्ष नितीन सुकळकर, सचिव ओमप्रकाश मुडे, वर्धा जिल्हा सहकार भारतीचे उपाध्यक्ष तुषार गिरडे आदींनी सहकार्य केले.