तरुणाच्या अवयवदानाने पाचजणांच्या जीवनात आनंद

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
अमरावती
organ-donation अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील एका तीस वर्षीय तरुणाच्या अवयवदानाने पाचजणांच्या जीवनात आनंद पेरला.

organ 
 
धीरज संतोष कलावते हे फ्लोअर मिलमध्ये काम करीत होते. १२ ऑगस्टला रात्री १०.४५ वाजता ते कारने जात असताना अपघात घडला. त्यांना लगेचच तेथील रुग्णालयात व नंतर अमरावतीला आरआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच खाल्यावल्याने रेडियंट सूपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूत तीव्र रक्तस्रावाचे निदान झाले. त्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. आनंद काकाणी आदींच्या चमूने तपासून, चाचण्यांनंतर धीरज यांना मेंदूमृत घोषित केले. समन्वयक डॉ. हर्षाली लखतरिया यांनी धीरज यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले. त्यांनी धीरज यांच्या यकृत, दोन मूत्रपिंड व बुबुळ दानास संमती दिली.
 
क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. मनीष श्रीगिरीवार, सचिव डॉ. शैलेश गहुकर, दिनेश मंडपे आदींनी पुढील कार्यवाही केली. प्रतीक्षा यादीनुसार एक मूत्रपिंड रेनबो रुग्णालय, दुसरे मूत्रपिंड किम्स किग्जवे हॉस्पिटल नागपूर, यकृत वोक्हार्ट, बुबुळ जिल्हा रुग्णालयातील रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. अमरावती शहर व जिल्हा पोलिस, नागपूर ग्रामीण व शहर वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिला.