तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
alert for disaster management दारव्हा तालुक्यातील दहेली येथील दुर्दैवी घटनेच्या पृष्ठभूमीवर पालकमंत्र्ी संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना करुन सतर्क राहण्याचे तसेच पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्रब कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, निवासी उप्पजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे व ईतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संजय राठोड यांनी तत्काळ उपाययोजनांचे निर्देश दिले. ते म्हणाले, दहेली येथील दुर्घटनेची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करावी. संबंधित ठेकेदार किंवा विभागाचा निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई करावी. सुरक्षा नियमांचे पालन झाले का याची तपासणी करुन दोषींवर कारवाई करावी.
पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला पूरप्रवण गावांची अद्ययावत यादी करावी. धोकादायक पूल, रस्ते व नाल्यांचे सर्वेक्षण, 247 आपत्ती नियंत्र्ण कक्ष कार्यरत ठेवा, हवामान विभागाच्या इशाèयांची त्वरित माहिती गावागावात पोहोचवा, आवश्यक बचाव साहित्याचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करा. नदी-नाले व पुलांवर पाणी आल्यास तत्काळ वाहतूक बंद करा, नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखणे, गावातील स्वयंसेवक बचाव पथक तयार करणे, वृद्ध, दिव्यांग व लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवणे. आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रत्येक गावात उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाऱ्या साहित्यांची व्यवस्था, पोहता येणाèया नागरिकांची तालुकानिहाय यादी, अग्निशमन, एसडीआरएफ व एनडीआरएफ सोबत समन्वय.alert for disaster management प्रत्येक तालुक्यात स्वयंसेवी बचाव पथक तयार करणे. पूरग्रस्त रस्त्यांवर बस सेवा बंद करणे, चालक-वाहकांनी धोकादायक परिस्थितीची माहिती नियंत्र्ण कक्षाला देणे, प्रवाशांना पर्यायी मार्गाची माहिती देणे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी निर्देश दिले आहेत.
दहेली येथील दुर्घटनाग्रस्तांची पालकमंत्र्यांकडून विचारपूस
दहेली दुर्घटनेत आर्णी तालुक्यातील लोणी येथील रहिवासी अविनाश खंडारे यांना वाचवण्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाला यश आले. मात्रब त्यांच्या पत्नी माधवी खंडारे तसेच दोन मुली प्राची व साची या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अविनाश खंडारे यांची विचारपूस करुन सांत्वन केले. तसेच तत्काळ मदतकार्य व आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.