नागपूर,
Annabhau Sathe समता, सामाजिक न्याय, श्रमिकांचे हक्क आणि वंचितांच्या सन्मानासाठी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून अखंड लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या विचारांनी आणि साहित्याने समाजात स्वाभिमान, संघर्ष आणि परिवर्तनाची प्रेरणा दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्याचा संकल्प करूया.
सौजन्य:श्रीकांत कुलकर्णी,संपर्क मित्र