उत्तर प्रदेश
bank employee उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हिमगिरी कॉलनी परिसरात एका बंद खोलीत 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणी बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळत असून, तिचा मृतदेह भाड्याच्या खोलीत सापडला आहे.
मृत तरुणीचे नाव प्रतिभा राणा असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या सहकाऱ्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला होता. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी प्रतिभाला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोनलाही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे काहीतरी अनर्थ घडल्याचा संशय सहकाऱ्यांना आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रतिभाच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून bank employee घेतल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी प्रतिभा घरात मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. मृत तरुणीचा मोबाईल फोन तसेच तिच्या इतर वस्तूंची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी तिच्या बँकेतील सहकारी, घरमालक आणि परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, प्रतिभा मानसिक तणावात असल्याचे कोणाकडूनही सांगण्यात आलेले नाही.प्रतिभाच्या मृत्यूमुळे हिमगिरी कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज पाहायला मिळणाऱ्या या तरुणीचा अचानक झालेला संशयास्पद मृत्यू शेजाऱ्यांसाठी धक्कादायक ठरला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.पोलीस अधिकारी कुमार रणविजय सिंह यांनी सांगितले की, 112 हेल्पलाइन क्रमांकावरून घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. नातेवाईकांच्या उपस्थितीत घराचा दरवाजा उघडण्यात आला आणि त्यावेळी प्रतिभा मृत अवस्थेत आढळली. घटनास्थळी कोणतीही शेवटची चिठ्ठी किंवा सुसाईड नोट आढळून आलेली नाही.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात पोलिसांना तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र, मृत्यूचे अधिकृत कारण पोस्टमार्टम अहवालातूनच स्पष्ट होईल.दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.