भरतनगरात बाल कीर्तनकाराचे कीर्तन

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Bharatnagar Citizens' Association भरतनगर नागरिक मंडळातर्फे श्री दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमानिमित्त आयोजित कार्यक्रमात इयत्ता दहावीची विद्यार्थिनी शांभवी लांबडे हिने कीर्तन सादर केले. तिच्या प्रभावी कीर्तनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
 

kirtan 
 
 
 
कीर्तनाला संवादिनीवर श्री विश्वास तर तबल्यावर यशस्व मानकर यांनी साथ दिली. महानगरपालिकेच्या सभापती शिवानी दाणी ,वखरें यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले,
सौजन्य:सुनील तांदुळकर,संपर्क मित्र