जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
weekly horoscope

weekly horoscope 
 
डॉ. श्रीरंग मनोहरनाथ दिवाण । ज्योतिषाचार्य । ९१५६५१६९१९
 
मेष : स्थावरविषयक कामे होतील रवी, गुरु ४ थे, ३ बुध, १२ वा शनी, स्थावरविषयक कामे होऊ शकतात. गाठीभेटी, प्रवास इ. धावपळ होईल. उत्तरार्धात कुटुंबातील किंवा कार्यालयातील काळजीने मन उद्धिग्न होईल. ज्या महिलांची प्रसूतीची शक्यता आहे त्यांची प्रसूती उत्तमरीत्या पार पडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोबल सुधारेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्यास तसेच सहकाऱ्यांशी जुळवून घेतल्यास कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. नवीन प्रशिक्षणासाठी निवड होऊन आपले ज्ञान अद्ययावत करण्याची संधी मिळेल व त्याचा कार्यक्षेत्रामध्ये फायदाही होईल. उत्तरार्धात कामे यशस्वी होतील. महिला वर्गाचे कौतुक होईल.
 
शुभ दिवस : २, ३, ४, ५.
वृषभ : आर्थिक परिस्थिती संतुलित राहील
विचारपूर्वक खर्च करणे आवश्यक असेल. या आठवड्यात तुम्हाला आत्मविश्वास आणि नियंत्रण जाणवेल, ज्यामुळे महत्त्वाची कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक जीवनात काही आव्हाने येऊ शकतात, परंतु संयम बाळगल्यास कौटुंबिक जवळीक आणि आनंद टिकून राहील. आरोग्यासाठी संतुलन आवश्यक आहे. कुठल्याही कामांमध्ये शॉर्टकट टाळा, कामाच्या ठिकाणी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. सकारात्मक विचारांमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. मोठा निर्णय घेण्याबाबत संभ्रम निर्माण होईल. कोणाशी भागीदारीत काम सुरू करण्याआधी विचार करा. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम ठरू शकतो.
 
शुभ दिवस : ३, ५, ७, ८.
मिथुन : पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या
आठवड्याच्या सुरुवातीला मनात काही चिंता असू शकतील. खरेदी करताना आर्थिक स्थिती लक्षात ठेवा. पत्नीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्याच्या मध्यात कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेद झाल्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमांना थोडा विलंब होऊ शकतो. शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असल्यास विचारपूर्वक गुंतवणूक करा, घाईमुळे तोटा सहन करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी कुशल आणि अनुभवी व्यक्तीच्या मदतीने तुम्ही चांगली देऊ शकाल. एखाद्या महिला मित्राच्या मदतीने रखडलेल्या कामाला गती मिळेल. अनावश्यक खर्च टाळल्यास विनाकारण तणाव निर्माण होणार नाही.
 
शुभ दिवस : ४, ५, ६, ७.
 
कर्क : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
रवी, गुरु लग्नात, केतू २ रा, शुक्र तिसरा, या काळात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. एखादा जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. लहान व्यावसायिकांसाठी काळ अपेक्षेपेक्षा चांगला असेल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या मित्राच्या किंवा प्रभावी हितचिंतकांच्या मदतीने, स्थावराचा जुना तिढा सुटल्याने मन शांत होईल. कोणताही वाद सोडवताना संबंधितांच्या भावनांची काळजी घ्या, अन्यथा वर्षानुवर्षाचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या कोणा तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीने सोडविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच हाताळणे योग्य ठरेल, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तरुणांचा बहुतांश वेळ मनोरंजनात जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात आहेत ते त्यांच्या भविष्याचे नियोजन करू शकतात.
 
शुभ दिवस : ५, ६, ७, ८.
सिंह : उपजीविकेसाठी महत्त्वाचा आठवडा
उपजीविकेच्या आणि व्यवसायाच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या मोठ्या योजनेत पैसे गुंतवू शकता, जे भविष्यात खूप लाभदायक ठरेल. व्यवसायात, गेल्या आठवड्यापेक्षा अधिक सक्रिय राहून तोटा भरून काढण्याच्या उद्देशाने तुम्ही अधिक कष्ट कराल. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. या काळात प्रिय व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नात्यात प्रेम वाढेल. अचानक एखादा जवळचा प्रवास होऊ शकतो. प्रवास आनंददायी असेल. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. महिलांना आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
 
शुभ दिवस : २, ४, ६, ७.
कन्या : आरोग्याची काळजी घ्या
या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नातेसंबंधात कुठला वादविवाद झाल्यास संयम बाळगा म्हणजे नुकसान होणार नाही. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. महिलांना आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यात छोट्या छोट्या गोष्टींमधून एखाद्या लहानशा कार्यक्रमातून एखाद्या लहान सहलीतून मोठा आनंद प्राप्त होईल. महिला धार्मिक कार्यात अधिक वेळ घालवतील. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आठवड्याच्या शेवटी, घराच्या दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. बेरोजगारांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत.
 
शुभ दिवस : ४, ५, ६, ७.
तूळ : गुंतवणुकीतून लाभ मिळेल
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने. लग्नाचे योग आहेत. आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुटुंबासमवेत सहलीला जाण्याचे नियोजन करू शकता. लांबचा किंवा कमी अंतराचा प्रवास सुखद ठरेल. संततीच्या बाबतीत चांगली बातमी मिळाल्याने मन आनंदी होईल. या सप्ताहात तुमच्या मुलांबाबतचे दायित्व पूर्ण होऊन कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळेल. वाहन खरेदीच्या प्रयत्नांना यश येईल. कला आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील. कार्यालयीन कामातीलदेखील सर्व जबाबदारी पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. मित्रांसोबत सहलीला गेलात तर ते फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते.
 
शुभ दिवस : ३, ५, ७, ८
वृश्चिक : घाईने निर्णय घेऊ नका
या आठवड्यात व्यावसायिक निर्णय घाईगडबडीत घेतला गेल्यास तो हानिकारक सिद्ध होऊ शकतो. तुमची आपल्या कर्मावरील निष्ठा आणि नियोजनबद्ध कार्य तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात पद व प्रतिष्ठा देईल. तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याच्या सौजन्यशील शैलीमुळे कामाच्या ठिकाणी प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक समस्यांवर धैर्याने उपाय शोधणे आवश्यक आहे. आतताईपणाने कुठलाही निर्णय घेऊ नका. यश मिळेल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अन्यथा आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराबरोबर असलेल्या संवादामुळे तणाव कमी होईल.
 
शुभ दिवस : ४, ५, ६, ७.
धनु : बोलण्यावर नियंत्रण ठेवा
तिसऱ्या स्थानात राहू, सुखस्थानात शनी, शत्रुस्थानात मंगळ आणि भाग्यात शुक्र केतू. या आठवड्यात बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या शब्दांना अधिक महत्त्व द्या. चांगल्या परिणामांसाठी वाणीचा मोठा उपयोग या आठवड्यात होईल. वाणीचा वापर चुकीच्या पद्धतीने झाल्यास त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात, कौटुंबिक आणि कार्यालयीन वातावरणात तणाव निर्माण झाल्यामुळे चिडचिड होऊ शकते. सासूरवाडीच्या लोकांची असलेले चांगले संबंध लाभदायक ठरू शकतात. जवळचे लोक तुमच्यापासून दूर काही काळाकरिता दूर जाऊ शकतात आणि अशा परिस्थितीत तुम्हाला एकटेपणा जाणवेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
 
शुभ दिवस : ३, ४, ५, ६.
मकर : कौटुंबिक आनंदाचा आठवडा
हा आठवडा कौटुंबिक आनंदाचा ठरेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जुना वाद तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे; तुमच्या संयमाचा फायदा होईल. नोकरीत नवीन प्रकल्पाकरिता नेमणूक होऊ शकते. वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल. व्यवसायात विस्तारासाठी चांगल्या संधी येतील; मात्र मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. कुटुंबासाठी खर्च वाढू शकतो. बचतीवर भर दिल्यास अडचणी वेळी कामात येईल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहितांसाठी चांगले संबंध मिळतील. श्वसनाचे आणि रक्ताच्या संबंधित त्रास असल्यास काळजी घ्या. नियमित तपासणी करणे फायदेशीर ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल.
शुभ दिवस : ३, ४, ५, ६.
कुंभ : ज्ञानवृद्धी होईल
हा आठवडा ज्ञानवृद्धीचा ठरू शकतो. विविध ज्ञानी आणि कुशल व्यक्तींशी संपर्क आल्याने नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. याचा व्यवसायात आणि कार्यालयीन कामात उपयोग होईल. आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. सत्संग घडेल, सत्संगातून मन:शांती प्राप्त होईल. एखादा महत्त्वाचा निर्णय फायदेशीर ठरेल. करीअर आणि व्यवसाय-नोकरीत बदल किंवा पदोन्नतीचे योग आहेत. परदेशी कंपनीत काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. कायदा आणि आयात-निर्यात क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होऊ शकतो. प्रवास किंवा शिक्षणासाठी खर्च वाढून दडपण येऊ शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी आणि विश्वासू व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे.
शुभ दिवस : ५, ६, ७, ८.
मीन : भाग्याची साथ लाभेल
राशी स्वामी गुरु पंचमात असून भाग्यावर दृष्टी आहे त्यामुळे भाग्याची साथ अवश्य लाभेल. या आठवड्यात अहंकार टाळा. स्वतःविषयी विनाकारण प्रभुत्वाची भावना नको त्यामुळे सहकारी दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी वेळेच्या वेळी केलेल्या बऱ्या, त्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. ऑफिसमध्ये कामाचा ताण अधिक असेल. व्यापाऱ्यांसाठी वेळ अनुकूल असेल. महिला व्यावसायिकांसाठीही हा एक चांगला काळ आहे. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी कुटुंबाबरोबर एखादा छोटासा समारंभ किंवा एखादी सहल आयोजित करा. आठवड्याच्या मध्यात एखाद्या विशिष्ट कामातून प्रवास होऊ शकतो. तरुण लोकही मनोरंजनात अधिक वेळ घालवतील. नात्यात प्रेम वाढेल.
शुभ दिवस : ३ ५, ७, ८.