मुलाला लागू होणार आईच्या विवाहापूर्वीचा धर्म
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू, राष्ट्रपतींची विधेयकाला मंजुरी, अधिसूचना जारी
दिनांक :02-Aug-2026
Total Views |
मुंबई
maharashtra-freedom-of-religion-act राज्य विधिमंडळाने पारित केलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली आहे. आता महाराष्ट्रात हा कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या कायद्यानुसार आंतरधर्मीय विवाह झाल्यास दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा धर्म लागू होणार आहे. राज्यात गेल्या काही काळापासून सक्तीच्या धर्मांतराच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पृष्ठभूमीवर हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असेल. कायद्याचे उल्लंघन झाल्यास सात वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. 
maharashtra-freedom-of-religion-act विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने ३० जुलै रोजी अधिकृत राजपत्रात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६ लागू झाल्याची नोंद केली आणि त्याच तारखेपासून तो अंमलात आला. मात्र, राज्य शासनाने यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक रविवारी जारी केले. नव्या कायद्यानुसार, राज्यात कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. या कायद्यामुळे राज्यात बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय आंतरजातीय अथवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या महिलेच्या मुलाला आईच्या विवाहापूर्वीचा धर्म लागू होणार आहे. कायद्यातील तरतुदींनुसार, दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा होणार आहे, तसेच पुन्हा गुन्हा करणाऱ्यांसाठी ही शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढू शकते. याशिवाय एक लाख रुपयांच्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
धर्मांतरापूर्वी ६० दिवस आधी सूचना अनिवार्य
maharashtra-freedom-of-religion-act या कायद्यामुळे बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतरणाला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच धर्मांतरित व्यक्तीचे पालक आणि इतर नातेवाईक यांना तक्रार करण्याचा अधिकार असणार आहे. स्वखुशीने धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना ६० दिवस आधी सूचना देणे अनिवार्य असणार आहे. याबाबत सक्षम प्राधिकरणाकडे लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे. प्राधिकरणाकडून कायदेशीर पडताळणी आणि मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित व्यक्तीला धर्मांतर करता येईल.
१२ राज्यांमध्ये यापूर्वीच कायदा अस्तित्वातमध्यप्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या १२ राज्यांमध्ये यापूर्वीच धर्मांतर-विरोधी कायदा अस्तित्वात आहे. तसेच झारखंड, कर्नाटक, हरयाणा आणि राजस्थानमध्येही असे कायदे करण्यात आले आहे.
अशा आहे कायद्यातील तरतुदी
- धर्मांतर करण्यापूर्वी ६० दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सूचना देणे बंधनकारक- दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंतचा कारावास आणि एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो
- महिला, अल्पवयीन मुले, किंवा अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमातीमधील (एसी) व्यक्तींच्या बाबतीत धर्मांतर झाल्यास सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड आहे.- सामूहिक धर्मांतर किंवा पुन्हा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांसाठी १० वर्षांपर्यंत कारावास आणि सात लाख रुपयांपर्यंत दंड
- पीडित व्यक्तीचे पालक, भावंडे किंवा रक्ताच्या नात्यातील इतर नातेवाईक तक्रार दाखल करू शकतात. हा गुन्हा अजामीनपात्र असेल.