विमानतळाचा व्यापक विस्तार टप्प्याटप्याने होणार

दुसऱ्या धावपट्टीनंतरच हवाई तळाचे स्थलांतर

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |

 

नागपूर
nagpur-airport डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाचे विकास कामे जीएमआर एअरपोर्ट्सच्या आराखड्यानुसार केल्या जात आहे. पहिल्या टप्यात विद्यमान प्रवासी टर्मिनलचे आधुनिकीकरण, प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा, अंतर्गत विमानतळ विस्ताराचे काम केले जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात दुसरी धावपट्टी विकसित करण्याचे नियोजन असल्याची माहिती जीएमआर समूहाचे कार्यकारी संचालक एस. जी. के. किशोर यांनी दिली आहे.


nagpur airport

 
कार्गो आणि लॉजिस्टिक्स हब

nagpur-airport  मध्य भारतातील प्रमुख विमान वाहतूक, कार्गो आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित करण्यासाठी जीएमआर ही कंपनी सज्ज झाली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करीत विविध कामे केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार प्रक्रियेत 'जीएमआर एअरो' कडून पुढील पाच ते आठ वर्षांत दुसरी धावपट्टी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही धावपट्टी कार्यान्वित झाल्यानंतरच भारतीय हवाई दलाच्या तळाच्या स्थलांतराची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

विकासाचे इंजिन ठरणार

nagpur-airport  विमानतळाच्या विस्तार कामांसाठी एकूण जमिनीपैकी सुमारे ९० टक्के जमीन 'जीएमआर एअरो'कडे हस्तांतरित करण्यात आली आहे, तर उर्वरित १० टक्के जमीन भारतीय हवाई दलाच्या ताब्यात आहे. भौगोलिक महत्त्व लक्षात घेता नागपूरचे विमानतळ भविष्यात मध्य भारताच्या विकासाचे इंजिन ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक शाश्वत आणि जागतिक दर्जाचे विमानतळ उभारण्याकडे लक्ष दिले जात आहे.

आराखड्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने

nagpur-airport नागपूर विमानतळाच्या विकास आराखड्यानुसार 'जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड' कडून विमानतळ विकास आराखड्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. मिहान इंडिया लिमिटेडने २५ जून २०२६ रोजी सुमारे एक हजार हेक्टर जमीन जीएनआयएलकडे हस्तांतरित केल्यानंतर विमानतळ विकासाच्या आठ वर्षांच्या आराखड्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात दुसरी धावपट्टी, नवीन 'एअर ट्रॅफिक कंट्रोल' (एटीसी) टॉवर, तांत्रिक इमारत आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. दुसरी धावपट्टी कार्यान्वित झाल्यानंतर दुसरे प्रवासी टर्मिनल आणि इतर विस्तार योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या नागपूर विमानतळावर नागरी तसेच लष्करी विमानांचे संचालन एकत्रितपणे सुरू आहे.