अल्लीपूर,
Cowshed catches fire in Neri वर्धा हिंगणघाट मार्गावरील नेरी येथील अभिजित जोगे यांच्या गावातील गोठ्याला भीषण आग लागली. यात ५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवार १ रोजी सायंकाळी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित जोगे यांचा गावात जनावरांना बांधण्यासाठी गोठा आहे. या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत दोन बैल, तीन गाई व दोन वासरांचा होळपळून मृत्यू झाला. तर शेतीचे साहित्य, खत व गुरांचा चारा व पाईप, पंप जळून खाक झाले. वीज वितरण कंपनीच्या खांबावरील तारांचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे गोठ्याला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या आगीत शेतकर्याचे ४ ते ५ लाख रुपयाचे नुकसान झाले. हंगामाच्या वेळीच बैल ठार झाल्याने आता शेती कशी करायची हा प्रश्न शेतकर्यांसमोर पडला आहे. या घटनेचा पंचनामा तलाठ्याने केला. शासनाने आर्थिक मदत द्या अशी मागणी शेतकरी जोगे यांनी केली आहे.