वृद्ध महिलेच्या जीवनात दामिनींनी पेरला आनंद

- दामिनी पथकाचे सकारात्मक पाऊल

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
bharosa sale एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलेला भाडेकरु असलेला युवक मद्यप्राशन करुन शिवीगाळ आणि घर हडपण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक त्रास देत होता. असहाय असलेल्या वृद्धेने भरोसा सेलकडे मदतीसाठी हाक दिली. दामिनी पथकाने लगेच सकारात्मकता दाखवून त्या वृद्ध महिलेच्या घरी भेट दिली. तिची कैफियत ऐकून घेतली आणि त्या युवकाला ताब्यात घेऊन ताबडतोब समस्याचे निराकरण केले. त्या युवकाने वृद्धेच दामिनींच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
 
 
वृद्ध महिलेच्या जीवनात दामिनींनी पेरला आनंद
 
 
 
७९ ‌वर्षांच्या शकुंतला या प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडे लेआऊटमध्ये राहतात. त्यांना एकुलती विवाहित मुलगी असून ती बाहेर राज्यात राहेत. पतीचे गेल्या तीन वर्षांपूर्वीच आजारपणात निधन झाले. पतीच्या निधनानंतर शकुंतला एकाकी झाल्या आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आला. त्यामुळे त्यांनी मोनू नावाचा एक भाडेकरी ठेवला. सुरुवातीला धार्मिक वृत्तीचा असलेल्या मोनू घरमालक शकुंतला यांना वेळेभर भाडे देणे किंवा तिला लागली ती मदत करीत होता. त्याने माटे चौकात एका चारचाकी वाहनात चायनिजची व्यवसाय सुरु केला. दिवसाला बक्कळ पैसा यायला लागला. त्यामुळे मोनूला दारुचे व्यसन जडले. तो रात्री-मध्यरात्री दारु पिऊन घरी यायला लागला. मोठमोठ्याने आरडाओरड करुन वृद्धेसह शेजाऱ्यांनाही त्रास द्यायला लागला. काही दिवस व्यवस्थित भाडे दिल्यानंतर मोनूने थेट भाडे देणे बंद केले. भाडे मागायला गेल्यास तो वृद्धेला अश्लील शिवीगाळ आणि घर हडपण्याची धमकी द्यायला लागला. असहाय वृद्ध महिला बिचारी हा सर्व प्रकार सहन करीत होती. गेल्या काही महिन्यांपासून त्याने भाडे दिले आणि वृद्ध घरमालक महिलेला मानसिक व शारीरिक त्रासही द्यायला लागला.
भरोसा सेलकडे मांडली कैफियत
वृद्ध शकुंतला यांनी काही शेजाऱ्यांची मदत घेतली आणि या त्रासातून सुटका मिळविण्यासाठी मदत मागितली. त्यांनी भरोसा सेलमध्ये जाण्यास सांगितले. शकुंतला यांनी भरोसा सेलला फोन केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा मते यांनी वृद्धेची तक्रार ऐकून घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिक सेलच्या रोशनी बोरकर यांना वृद्धेची मदत करण्याचे निर्देश दिले. शकुंतला यांना पोलिसांनी विश्वास दाखवत मदतीचे आश्वासन दिले.
दामिनींची तत्परता
दामिनी पथकातील पोलिस हवालदार प्रीती थोटे, रेखा कावळकर, संध्या देशमुख, सारिका कुमरे, सोनाली उके आणि शुभांगी कडव या लगेच प्रतापनगरातील वृद्धेच्या घरी पोहचल्या. सत्यस्थिती जाणून घेतली आणि बाहेर गेलेल्या भाडेकरु मोनूचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेतले आणि वृद्धेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याबाबत कारवाई करीत असल्याचे सांगितले. ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतलेल्या मोनूला ‘प्रसाद’ देताच तो थेट वृद्धेची माफी मागायला लागला. त्याने लगेच भरभाडे दिले. तसेच त्याने दारु सोडून दुसरीकडे बस्तान बसविण्याचा निर्णय घेतला.bharosa sale अशाप्रकारे एका वृद्धेच्या अंधकारमय आयुष्यात दामिनी पथकाने उजेड पेरला.