भारताच्या नकाशातील चूक लक्षात आणली

लवलिनाची परदेशातील कामगिरी

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |

 

ग्लासगो
error-in-indias-map ऑलिम्पिक पदक विजेती लवलिना बोरगोहेन हिच्या सतर्कतेमुळे ग्लासगोमधील एका रेस्टॉरंटने भारताचा चुकीचा नकाशा दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. रेस्टॉरंटच्या आवारात लावलेला भारताच्या नकाशात ईशान्य भारताचा भाग वगळला होता, ही बाब भारतीय मुष्टियोद्धा लवलिना बोरगोहेन हिच्या लक्षात आली. हा चुकीचा नकाशा नॅपकिन्सवर आणि 'मिस्टर सिंग्स इंडिया' या लोकप्रिय रेस्टॉरंटच्या बाहेरही प्रदर्शित करण्यात आला होता. रेस्टॉरंटने आपली चूक मान्य केल्याची पुष्टी 'भारतीय मुष्टियुद्ध महासंघा’चे अध्यक्ष अजय सिंग यांनी केली.

lavlina
 
 error-in-indias-map चुकीचा नकाशा दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन रेस्टॉरंटने भारतीय पथकाला दिले. त्यामुळे मात्र, रेस्टॉरंट व्यवस्थापनासोबत कोणताही वाद झाला नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने मुष्टियुद्धामध्ये जिंकलेल्या १० पदकांच्या निमित्ताने आयोजित एका सेलिब्रेशनदरम्यान ही घटना घडली.
 
error-in-indias-map ग्लासगोमधील एका लोकप्रिय भारतीय रेस्टॉरंटने भारतीय पथकाला आश्वासन दिले आहे की ते आपल्या आवारात लावलेला भारताचा नकाशा दुरुस्त करतील; बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने त्या नकाशात ईशान्य भारताचा भाग नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते, असे भारतीय मुष्टियुद्ध महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी रविवारी सांगितले.
 

error-in-indias-map कोणताही वाद झाला नाही. ती एक चूक होती आणि आम्ही - मी आणि लवलिनाने - ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि ती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले, असे सिंग यांनी सांगितले.