आज राष्ट्रकुल स्पर्धेचा शेवटचा दिवस!

भारताच्या पदकांवर सर्वांची नजर

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
ग्लासगो,
final day of the Commonwealth Games ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा आज (२ ऑगस्ट) अखेरचा दिवस असून भारताचे खेळाडू ज्युडो, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरासायकलिंगमध्ये पदकांसाठी मैदानात उतरणार आहेत. १ ऑगस्टपर्यंत भारताने एकूण ३९ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, १ ऑगस्ट हा दिवस भारतीय ताफ्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला. एका दिवसात तब्बल १६ पदकांची भर पडली असून त्यामध्ये बॉक्सिंगमधील ७ सुवर्णपदकांचा मोठा वाटा होता. त्यामुळे अंतिम दिवशीही भारताच्या पदकसंख्येत आणखी वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 
 
 mumbai
 
अंतिम दिवसाच्या स्पर्धांमध्ये ऑलिम्पियन अवतार सिंग यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरुषांच्या १०० किलो वजनी गटाच्या एलिमिनेशन फेरीत त्यांचा सामना सायप्रसच्या अरिस्टोस मायकल याच्याशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळाल्यास अवतार सिंग पुढील फेरीत प्रवेश करतील. त्याचबरोबर महिलांच्या ७८ किलो वजनी गटात ईश्वर नारंग यांची लढत स्कॉटलंडच्या निकोल वूड हिच्याशी होणार आहे. पुरुषांच्या १०० किलोपेक्षा अधिक वजनी गटात यश घंगासही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारतीय ज्युडोपटूंनी प्रारंभीच्या फेऱ्या पार केल्यास त्यांना पुढील फेरी आणि त्यानंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.
 
 
ट्रॅक सायकलिंगमध्ये दिनेश कुमार आणि हर्षवीर सिंग सेखोन हे पुरुषांच्या ४० किलोमीटर पॉइंट्स रेसच्या पहिल्या फेरीत सहभागी होतील. या स्पर्धेत पात्र ठरल्यास ते रात्री होणाऱ्या पदक फेरीतही उतरतील. याशिवाय रोनाल्डो सिंग लैतोंजाम पुरुषांच्या १००० मीटर टाइम ट्रायल पदक स्पर्धेत सहभागी होणार असून पॅरासायकलिंगमध्ये लिशा दास महिला C4-C5 १००० मीटर टाइम ट्रायलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आतापर्यंत चौथ्या स्थानावर पोहोचलेल्या भारतीय ताफ्याकडून अंतिम दिवशीही पदकांची कमाई होईल, अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे.