ईव्ही चार्जिंग स्टेशनला आग, ११ दुचाकींसह बस जळून खाक

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
fire at ev charging station दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरातील एका इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनला शनिवारी आग लागल्याने सर्वत्र घबराट पसरली. आगीने संपूर्ण चार्जिंग स्टेशनला वेढल्यामुळे एक इलेक्ट्रिक बस, ११ दुचाकी, दोन उच्च-क्षमतेचे चार्जिंग युनिट्स, दोन पॉवर डिस्ट्रिब्युशन बोर्ड आणि एक सबस्टेशन जळून खाक झाले.
 
 
fire at ev charging station
 
माहिती मिळताच अग्निशमन दलाची सात वाहने घटनास्थळी दाखल झाली. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे़ अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया विहार बस स्टँडजवळील राधा स्वामी आश्रमाजवळ असलेल्या फोर्टम चार्ज ॲण्ड ड्राईव्ह इंडिया लिमिटेडच्या चार्जिंग स्टेशनला शनिवारी सकाळी आग लागली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाची सात वाहने तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. ही आग अंदाजे ३६० किलोवॅट क्षमतेच्या चार्जिंग पॉईंटला लागली आणि लवकरच तिने दुसऱ्या चार्जिंग पॉईंटलाही कवेत घेतले. त्यानंतर आग वेगाने पसरली आणि दोन ६३०-अँपिअर पॉवर डिस्ट्रिब्युशन बोर्ड आणि एका १२५० केव्हीए सबस्टेशनपर्यंत पोहोचली.