नागपूर
rainfall जुलै महिन्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्यानंतर आता ऑगस्टच्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला आहे. यानंतर आता १५ ऑगस्टनंतरच पुन्हा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेले चार-पाच दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर पुढील दोन दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर, ५ व ६ ऑगस्टला सर्वत्र पाऊस पडेल. त्यानंतर पुन्हा पाऊस विश्रांती घेईल, पण तुरळक पाऊस होईल.
rainfall गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा उत्तर पश्चिम दिशेला गेला आहे. तो राजस्थानच्या दिशेने वळला. परिणामी, पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे तापमानात कुठलाही बदल झाला नाही. तापमान पुढील काही दिवस स्थिर राहील, असा अंदाज आहे. रविवारी काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. कमाल तापमान ३१.६ अंश सेल्सिअसची नोंद केली.
rainfall चार दिवसांच्या पावसाने जुलै महिन्यात ३३५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा ६ टक्के अधिक आहे. त्यानुसार १ जून ते ३१ जुलैच्या कालावधीत एकूण ४५४.७ मि.मी. पाऊस झाला. विशेषतः एल निनोचा प्रभाव असूनही पावसाने तूट भरून काढली.