भारत-अफगाण जवळिकीने पाकिस्तान अस्वस्थ!

आयएसपीआरचे वादग्रस्त वक्तव्य

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
इस्लामाबाद,
India-Afghanistan upset Pakistan भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वाढत असलेल्या संबंधांवरून पाकिस्तानने पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्तान लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (ISPR) जारी केलेल्या निवेदनातील काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून भारतावर अफगाणिस्तानमधील घडामोडींमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला असून, भारताने हे आरोप यापूर्वीप्रमाणेच निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.रावळपिंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ISPRचे महासंचालक लेफ्टनंट अहमद चौधरी यांनी भारत-अफगाणिस्तान संबंधांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धार्मिक संदर्भ देत आपली भूमिका मांडली. अफगाण तालिबानमधील एका मंत्र्याच्या भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधांबाबतच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी भारताशी वाढत्या संबंधांवर आक्षेप नोंदवला.
 
 
 

sharpa 
यावेळी लेफ्टनंट अहमद चौधरी यांनी पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी भारत अफगाण तालिबानला मदत करत असल्याचा आरोपही केला. मात्र, भारताने अशा प्रकारचे आरोप अनेकदा फेटाळून लावत ते पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.पत्रकार परिषदेत चौधरी यांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या 'डीएनए'चा उल्लेख करतही भाष्य केले. त्यांनी अफगाण तालिबान आणि भारत यांच्यातील संबंधांवर टीका करत काही वादग्रस्त दावे केले. तसेच धार्मिक तत्त्वांचा उल्लेख करून भारताशी मैत्री करणाऱ्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पाकिस्तानच्या या वक्तव्यानंतर भारत-अफगाणिस्तान संबंधांबाबत पुन्हा एकदा राजनैतिक चर्चेला उधाण आले आहे. भारताने मात्र यापूर्वीही अशा सर्व आरोपांचे सातत्याने खंडन करत अफगाणिस्तानबाबतची आपली भूमिका विकास, सहकार्य आणि लोकहितावर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे.