अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करा

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
सुरत,
Investigate the assets of Deepak's father. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आर्थिक व्यवहारांबाबत नवा वाद समोर आला आहे. सुरत येथील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी पक्षाच्या कथित 'लीगल डिफेन्स फंड'सह संस्थेच्या आर्थिक स्रोतांची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोग आणि कर विभागाकडे केली आहे. तसेच पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या वडिलांच्या मालमत्तेचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.अमित तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी CJPच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कायदेशीर मदतीसाठी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीची चौकशी होणे आवश्यक आहे. या निधीची उभारणी आणि त्याचा वापर कोणत्या पद्धतीने होणार, याबाबत स्पष्टता असावी, असे त्यांनी नमूद केले आहे.
 
 

Investigate the assets of Deepak 
यासोबतच अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त कर्मचारी असल्याचा उल्लेख करत, त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे. निवृत्त कर्मचाऱ्याच्या उत्पन्नातून परदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च कसा उचलला गेला, याची पडताळणी व्हावी, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.तिवारी यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात CJP ही अधिकृतपणे नोंदणीकृत राजकीय संस्था आहे की नाही, याची खातरजमा करण्याची मागणी केली आहे. संस्था नोंदणीकृत नसताना राजकीय पक्षाप्रमाणे काम करणे किंवा निधी उभारणे हे नियमांच्या चौकटीत तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
 
 
याशिवाय त्यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाकडे (CBIC)ही पत्र पाठवून कपिल सिब्बल यांनी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या योगदानावर जीएसटी लागू होतो का, याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.दरम्यान, CJPने २७ जुलै रोजी नीट पेपरफुटी आंदोलनानंतर विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी 'लीगल डिफेन्स फंड' स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्या वेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या निधीसाठी १ कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले होते. तसेच देशभरातील वकिलांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले होते. CJPचे प्रवक्ते सौरव दास यांनी त्यावेळी सांगितले होते की, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर विविध राज्यांत गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या कायदेशीर संरक्षणासाठी हा निधी तयार करण्यात आला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी संपर्क सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. पत्रकार परिषदेदरम्यान कपिल सिब्बलही उपस्थित होते. अभिजीत दिपके हे ३० वर्षीय डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट असून ते छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठात पब्लिक रिलेशन्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.