जंतर-मंतर आंदोलनात घातपाताचा कट उधळला?

जैशशी संबंधित संशयित मॉड्यूलवर एसटीएफची कारवाई

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
कोलकाता,
Jantar Mantar protest पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेल्या संशयित मॉड्यूलच्या तपासात आणखी एक मोठी कारवाई करत अर्पिता सरकार हिला झारखंडमधील साहिबगंज येथून अटक केली आहे. एसटीएफच्या माहितीनुसार, अर्पिता ही यापूर्वी अटक करण्यात आलेल्या हमीम मंडलची कथित साथीदार आणि प्रेयसी असून, या प्रकरणाच्या तपासासाठी तिला पश्चिम बंगालमध्ये आणण्यात आले आहे.एसटीएफचे महानिरीक्षक गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्व बर्दवान जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला हमीम मंडल हा पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या सतत संपर्कात होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रस्तावित आंदोलनादरम्यान पोलिसांचा गणवेश परिधान करून हिंसाचार घडवून आणण्याचा कट आखण्यात आल्याचा संशय आहे. या दाव्याची सखोल चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

fg67678 
 
तपासादरम्यान हमीम मंडलच्या मोबाईल फोनसह इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात आली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तो व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इतर मेसेजिंग अॅप्सद्वारे आपल्या कथित सूत्रधारांच्या संपर्कात होता. तसेच एनक्रिप्टेड चॅट्सचा वापर करून काही तरुणांना आपल्या नेटवर्कमध्ये सामील करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. एसटीएफच्य दाव्यानुसार, जंतर-मंतर येथे प्रस्तावित विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घातपात आणि हिंसाचार घडवण्याची योजना आखण्यात आली होती. या योजनेत पोलिसांचा गणवेश परिधान करून आंदोलनात घुसखोरी करणे आणि त्यानंतर हिंसक कारवाया घडवून आणण्याचा कट असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच पाकिस्तानस्थित हँडलर्सशी कथित संपर्काचे स्वरूप काय होते, याचा तपास एसटीएफकडून सुरू आहे.